
नवी दिल्ली वृत्तसंस्था
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
महिला एकदिवशी क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ भारत आणि श्रीलंकेत ३० सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ही टुर्नामेंट २ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार असून यातील काही सामने कोलंबोमध्ये खेळले जातील.
आयसीसीकडून या एकदिवशीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आधी भारत या वर्ल्ड कपचे यजमान पद भुषवणार होते. परंतु आता श्रीलंकेत सुद्धा सामने होणार आहेत. भारतात बेंगळुरू, गुवाहाटी, इंदौर, विशाखपट्टणम, कोलंबोमध्ये सामने खेळले जाणार आहेत.
पाकिस्तानचा संघ सामने खेळण्यासाठी भारतात येणार नसल्यानं कोलंबोमध्येही या टुर्नामेंटचे काही सामने होणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हायब्रिड मॉडलला मंजुरी देण्यात आली होती. त्याअंतर्गत भारताने आपले सामने दुबईमध्ये खेळले होते. तर पाकिस्तान आणि इतर संघाचे सामने पाकिस्तानात झाले होते. याचपद्धतीने आयसीसीने महिला टी२० विश्व कपचे काही सामने भारताबाहेर करण्यात येतील असा निर्णय घेतलाय.
ही टुर्नामेंट बेंगळुरूमध्ये ३० सप्टेंबरपासून सुरू होतील. भारतात १२ वर्षानंतर महिला क्रिकेट विश्व कप आयोजित करण्यात येत आहे. या टुर्नामेंटमधील पहिला उपांत्य फेरीचा सामना २९ ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबो येथे होईल. तर दुसरा सामना ३० ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये खेळला जाईल. तर अंतिम सामना दोन नोव्हेंबरला बेंगळुरू किंवा कोलंबोमध्ये होईल. यजमान भारतासह गतविजेता चॅम्पियन आस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिका यात सहभाग घेणार आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशाने एप्रिलमध्ये सहा संघ क्कालीफायरमध्ये दुसऱ्या स्थानी राहिले होते. आस्ट्रेलिया सातवेळा चॅम्पियन राहिलाय. पण भारत एकदाही कप जिंकू शकला नाही. यावर्षी भारत विजेतेपद घेण्याच्या प्रयत्नात असेल.