मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संपर्क क्रमांकांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या असून, सर्व दूरध्वनी सेवा पुन्हा सुरु झाल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
महिला आयोगाचे दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९२७०७ आणि टोल फ्री क्रमांक १५५२०९ हे तांत्रिक कारणामुळे बंद झाले होते. मात्र, आज दिनांक २७ मे २०२५ रोजी सकाळी ६.१५ पासून हे क्रमांक पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या काळात संपर्क न होऊ शकलेल्या महिलांना आयोगाने ०२२-२६५९२७०७, ०२२-२६५९०४७४, ०२२-२६५९०९००, ०२२-२६५९११४२ या पर्यायी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ईमेलद्वारे संपर्कासाठी mscwmahilaayog@gmail.com हा पर्याय देखील खुला ठेवण्यात आला आहे.
महिला आयोगाच्या कार्यालयीन वेळेत तक्रारी किंवा विचारणा केल्या जाऊ शकतात. दरम्यान, महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारच्या ११२ आणि १८१ या हेल्पलाइन क्रमांकांवर २४x७ संपर्क साधता येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.


