
मुंबई प्रतिनिधी
आयपीएलचा हा हंगाम खूपच रोमांचक अवस्थेत आला असून आता प्ले-ऑफच्या सामन्यांचा रणसंग्राम होणार आहे. आयपीएलचे लीग सामने संपले आहेत आणि आता खरी लढाई सुरू होणार आहे.
प्लेऑफमधील चार संघ निवडले गेले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, राॅयल चॅलेंजर बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे चार संघात भिडत होणार आहे. यातील सर्वोत्कृष्ट संघ आयपीएलची ट्राॅफी घेऊन जाईल. अर्थात विजेता बनणार आहे.
पंजाब किंग्ज आणि (पीबीकेएस) आरसीबी क्वालिफायर-१ मध्ये एकमेकांशी भिडतील, तर मुंबई इंडियन्स (एमआय) आणि गुजरात टायटन्स (जीटी) एलिमिनेटरमध्ये भिडतील. प्रत्येक सामना आता करा किंवा मरो असा असेल, कारण पराभव स्वप्न भंग करू शकतो. उद्या 29 मे पासून प्लेऑफच्या लढती सुरू होणार आहेत. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ क्वालिफायर-१ मध्ये एकमेकांशी भिडतील. हा सामना मोहालीजवळील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
पंजाब किंग्ज पहिल्यांदाच क्वालिफायर-१ मध्ये पोहोचले आहे आणि त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो, परंतु त्यांच्यासमोर आरसीबी सारखा संघ आहे, ज्याने उत्तम फॉर्ममध्ये राहून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. विराट कोहलीचा संघ मात्र या स्पर्धेत प्रमुख दावेदार असून त्यासोबतच पंजाबचा संघही विजयाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. तुलनेत गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडून आतापर्यंतची कामगिरी पाहता खूप जास्त रसिकांना अपेक्षा नाही.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 मे रोजी यांच्यात एलिमिनेटरचा सामना खेळला जाईल, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर येतील. हा सामना मुल्लानपूरमध्येही होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचेल, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सने या हंगामात अनेक मोठ्या सामन्यांमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे, विशेषतः त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या बळावर मुंबईकडे हुकमी एक्का गोलंदाज जसप्रित बुमराह हा आहे. त्यामुळे क्वालिफायर-2 निर्णायक ठरेल क्वालिफायर-2 सामना 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. यामध्ये क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेत्या संघामध्ये सामना होईल. हा सामना कोण अंतिम फेरीत पोहोचेल आणि कोणाचे जेतेपदाचे स्वप्न येथे भंगेल यासाठी निर्णायक ठरेल.
अंतीम सामना कधी खेळला जाईल?
आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. हा सामना क्वालिफायर-1 मधील विजेता आणि क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघात होईल.
आयपीएल 2025 प्लेऑफ
क्वालिफायर-1, 29 मे: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- मुल्लानपूर
एलिमिनेटर 30 मे : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स- मुल्लानपूर
क्वालिफायर 2, 1 जून: क्वालिफायर 1 पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता- अहमदाबाद
अंतिम सामना, 3 जून: क्वालिफायर 1 विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 विजेता- अहमदाबाद
कुठे पाहाल हे सामने?
आयपीएल 2025 प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वेगवेगळ्या भाषांमध्ये केले जाईल. ऑनलाइन प्रेक्षकांसाठी, आयपीएल 2025 प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओसिनेमाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध असेल. सामने येथे हाय डेफिनेशन गुणवत्तेत मोफत पाहता येतील.