
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषत, सातारा तालुक्यातील चिंचणेर आणि वंदन परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडला असून, त्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ढगफुटी सारख्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे.
पाण्याचा रौद्र रूप इतका भयानक आहे की लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे..
चिंचणेर वंदन येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे(Flood) बाजार पटांगणावर पाणी आले. या पटांगणावर लावलेल्या चार ते पाच चार चाकी गाड्या पाण्यामध्ये गेली. यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेसीबी चालक उमेश राठोड याने तात्काळ जेसीबीच्या मदतीने प्रत्येक वाहन या पटांगणावरून सुरक्षित स्थळी हलवले.
यामध्ये एक कार ओढ्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात थोडक्यात बचावली. जेसीबी चालकाने या पटांगणावरील सर्व वाहने सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जेसीबी चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सोशल मीडियावरही या घटनेचे सर्व व्हिडिओ आणि फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत.