
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यासाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्याला नवे धरण मिळणार आहे. या धरणाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कोरडवाहू क्षेत्र या धरणामुळं बागायची होणार आहे.
या धरणामुळं माण तालुक्यासह फलटण, वाई तालुक्यातील पाणी प्रश्न मिटणार आहे.
साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये नवीन धरण बांधण्याची तयारी
सातारा जिल्ह्याला नवे धरण मिळणार आहे. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये नवीन धरण बांधण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. सोळशी धरण बांधणीसाठी आज आढावा बैठक घेण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला मंत्री जयकुमार गोरे, मकरंद पाटील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांनी चर्चा केली.
शेती बागायती होणार
दरम्यान, सातारा जिल्ह्यात नवीन धरण होणार ही बातमी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी आहे. कारण या धरणामुळं मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. माण तालुक्यासह फलटण, वाई तालुक्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, या धरणाच्या बांधकामामुळं या तिन्ही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या ठिकाणची शेती बागायती होण्यास मदत होमार आहे.