
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समता महोत्सव २०२५’ हा भव्य सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, अभिनेते मिलिंद शिंदे, बौध्द धर्मप्रचारक भदंत आर. आनंद, आंबेडकरी साहित्य संग्रहक रमेश तुकाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या पानसरकर, आणि प्रियदर्शनी जाधव यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे आणि ज्येष्ठ नेते व मंत्री मा. ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात भीम गीतांचा विशेष कार्यक्रम गायक आदर्श शिंदे यांनी सादर करत वातावरण भीममय केले.
या वेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, आमदार शसना मलिक-शेख, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार झिशान सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक व मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्तेसंजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस श संतोष धुवाळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, माजी नगरसेवक कप्तान मलिक, मुंबई महिला अध्यक्षा मा. आरती साळवी, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष विभू घुगे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला मुंबई विभागातील पदाधिकारी, उत्तर मध्य जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, वॉर्डाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘समता महोत्सव २०२५’ च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक समतेचा वसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.