
मुंबई प्रतिनिधी
अजिंक्यतारा–प्रतापगड साखर उद्योगा’च्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट वर्षा निवासस्थानी घेण्यात आली.
या भेटीदरम्यान साखर उद्योगासमोरील अडचणी, धोरणात्मक निर्णय तसेच भविष्यातील योजना यासंदर्भात सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेवेळी साखर उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘अजिंक्यतारा–प्रतापगड साखर उद्योग हा ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्याच्या बळकटीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.’
या बैठकीस प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासोबत विविध मान्यवर प्रतिनिधीही उपस्थित होते.
या सकारात्मक निर्णयामुळे स्थानिक शेतकरी, कामगार आणि साखर उद्योगाशी संबंधित घटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सरकारच्या सहकार्यामुळे उद्योगाला नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.