मुंबई प्रतिनिधी
पुण्यानंतर मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. अर्ध्या तासाच्या पावसाने मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत.
काही भागात रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे. मात्र, या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, मागील तासाभरापासून मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या दिलासा मिळाला. पश्चिम उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.
मुंबईच्या दहिसर पूर्व येथील एस वी रोड, शिवाजी रोड, पेट्रोल पंप परिसरातील रस्ते जलमय झाले. अर्ध्या तासांतच पावसामुळे रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर या विभागात सरी बरसल्या.
मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी मार्केट, कांदिवलीतील गांधी नगर भाजी बाजारात पाणी भरलं. या पाण्यातच वाट काढत नागरिकांना घर गाठावं लागत आहे. मुंबई पश्चिम उपनगरमधील बांद्रा या विभागात पावसाला कोसळत आहे. या पावसामुळे अंधेरीतील सबवे बंद झाला. तर काही भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
नवी मुबंईतील पनवेल परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पनवेल, कळंबोली आणि खारघर परिसरात विजेच्या कडकडाटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झालीय. तर नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी परिसरात वीज चमकत मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी बरसत आहेत.


