
नवी दिल्ली वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरित होऊन 2010 मध्ये या पुरस्काराची घोषणा झाली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या समितीमध्ये संसदेतील अनुभवी सदस्य आणि सदस्य नसलेल्यांपैकी तज्ज्ञ लोकांचा समावेश असतो.
भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी नावं जाहीर करताना विविध बाबी तपासल्या जातात. सदस्यांच्या कामगिरीचा डेटा काढला जातो. संसदेतील चर्चेत किती सहभाग होता, हे पाहिलं जातं.
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचंही नाव संसदरत्न पुरस्कार जिंकलेल्यांच्या यादीत आहे. हे पुरस्कार खासदारांना दिले जात असले तरी ते सरकारतर्फे नसतात. चेन्नईतील प्राइम पॉईंट फाऊंडेशन आणि ई मॅगझिन यांच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
खासदारांच्या मूल्यांकनासाठी एक समिती नेमली जाते. वर्षभराच्या काळात तिन्ही अधिवेशनांमधील खासदारांची कामगिरी कशी आहे, यावरून त्यांची निवड केली जाते. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.