
अमरावती प्रतिनिधी
अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूर येथे उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज 16 मे रोजी दुपारी पोलिस कवायत मैदानावर त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अमरावती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात रेड्डी यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
पोलिस दलातील सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे योगदान आणि नेतृत्व याची प्रशंसा केली. नवीनचंद्र रेड्डी यांनी आपल्या निरोप भाषणात अमरावतीतील कार्यकाळ स्मरणात ठेवण्याजोगा ठरल्याचे सांगितले. त्यांनी सहकाऱ्यांचे, नागरीकांचे आणि विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार मानले. त्यांच्या कार्यकाळात अमरावतीत कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक सकारात्मक बदल घडून आले. त्यांच्या जाण्याने अमरावती पोलिस दलात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. आता ते नागपूरमध्ये उपायुक्त म्हणून नवे जबाबदारीचे कार्य स्वीकारणार आहेत.