
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे.
तर शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाका सुरू झाल्याचं दिसतंय. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश देण्यात आले आहेत. सध्या राज्यातील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
रविंद्र शिसवे हे या आधी मुंबईतील लोहमार्ग पोलिस आयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची बदली आता राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नागपूर शहराचे पोलिस सहआयुक्त निसार तांबोळी यांची बदली ही राज्य राखीव पोलिस दलाच्या महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांची बदली नागपूर शहराच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे.
* कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स निसार तांबोळी – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर एन डी रेड्डी – पोलिस सहआयुक्त, नागपूर सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन
वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांची बदली करण्यात आली असली तरी ठिकाणी अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. त्यांच्या बदलीचे ठिकाण नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.