
मुंबई प्रतिनिधी
आमदार वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शासकीय वसाहतीतील नागरिक यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पावसाळ्यापूर्व नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, नवीन शासकीय वसाहतीतील बंद पडलेली सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा तसेच नागरिकांच्या विविध तक्रारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांनी मांडलेल्या समस्या गांभीर्याने घेत, आमदार सरदेसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना येत्या १० दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. शासकीय यंत्रणेला दिल्या असून अधिक सक्रिय करण्यावरही त्यांनी भर दिला.
या बैठकीस स्थानिक शिवसेना पदाधिकारीही उपस्थित होते. स्थानिकांनी आमदार सरदेसाई यांच्या त्वरित कृतीसंदर्भातील भूमिकेचे स्वागत केले असून, येत्या काही दिवसांत या समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.