
पुणे प्रतिनिधी
नागरिक आणि पोलिस यांच्यामधील विश्वास अधिक दृढ व्हावा तसेच गुप्त माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे राहण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ‘एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार ही नवीन तंत्रज्ञान सक्षम योजना १ मे २०२५ पासून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबवित आहेत.
याबाबत पुणे मुख्यालय येथील हॉलमध्ये एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार ही एक नवीन तंत्रज्ञान – सक्षम योजना या योजनेच्या अनुषंगाने योजनेचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रकार परिषदेद्वारे माहिती दिली असून या अंतर्गत पुणे जिल्ह्यात एकुण १३ तालुके, ३३ पोलीस स्टेशन, व १५७४ गावे व बऱ्याच वाडया वस्त्या समाविष्ठ आहेत.
सदर योजनेकरीता १२९२ पोलीस पाटील व १५२५ पोलीस अंमलदार हे प्रत्येक गावाकरीता नेमण्यात आले आहेत. तसेच या योजनेकरीता “सुरक्षित पुणे ग्रामीण” या मोबाईल अँपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांची नोंदणी करण्यात आली आहे.सुरक्षित पुणे ग्रामीण या मोबाईल अँपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांनी गाव भेट देताना, त्यांचे जिओ टॅग लोकेशन व फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे, जेणेकरुन, प्रभावीपणे ही योजना अंमलात आणता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.