
मुंबई प्रतिनिधी
मुंबई: कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. आगीमुळे मॉलभर धुराचे लोट पसरले असून, तातडीने सर्व ग्राहक आणि कर्मचारी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग रात्रीच्या सुमारास फूड कोर्ट विभागात लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.