
मुंबई प्रतिनिधी
मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक
मुंबईच्या बांद्रा येथे असलेल्या एसआरए कार्यालयाबाहेर वरळीच्या सिद्धार्थनगरचे रहिवासी आणि मनसे कार्यकर्ते यांनी प्रशासनाविरुद् मोर्चा काढण्यात आला
आहे.
प्रेमनगर इथला विकास रखडलेला आहे. गेल्या 27 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प हा आजतागायत का पूर्ण झालेला नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी जमा झालेले बघायला मिळत आहेत. सध्या या आंदोलकांना कार्यालयापासून 100 मीटर लांबच पोलिसांकडून रोखण्यात आलेलं आहे.