
मुंबई प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा ‘नया भारत’ या नवीन स्टँडअप स्पेशल शोद्वारे पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे. या शोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका केली आहे. यामुळे आता तो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांनी या व्हिडिओवर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनवर एक गाणं बनवलं आहे. या गाण्यातून त्यांच्यावर टीका केली आहे. यामुळ आता वातावरण तापलं आहे.
कुणाल कामराच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत कुणाल कामरा राजकारणाविषयी बोलत आहे. तसेच महायुतीवर निशाणा साधताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरूवातीलाच तो म्हणत आहे की, शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. यानंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. नंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर पडली. एका मतदाराला 9 बटन दिले होते. यामुळे सर्व संभ्रमात पडले होते.
एकनाथ शिंदेंवर बोलताना तो पुढे म्हणाला की, पक्ष एकाने चालू केला आहे. ठाणे येते राहतात. यानंतर कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेली कविता म्हणून दाखवली. यानंतर वातावरण कमालीचे तापले आहे. या गाण्याची सुरूवात ”ठाणे की रिक्षा, चेहरे पे डाढी” अशी आहे. या गाण्यातून त्याने एकनाथ शिंदेंनवर घणाघाती टीका केली आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच या विरोधात आता शिवसैनिक आक्रमक झाले आहे.
गाणं वाचून दाखवल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तो म्हणाला की, हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाहीचा वाद संपवायचा होता. कुणाचा बाप चोरुन घेतला. काय रिप्लाय असेल? मी उद्या सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटतो. नंतर एकत्र जेवण करतो. त्यानंतर अर्जून तेंडुलकरचं कौतुक करत त्याला बोलेन, भावा आजपासून सचिन तेंडूलकर माझा बाप, अशी घणाघाती टीका त्याने केली आहे.
या गाण्याच्या विरोधात शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. तसेच कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली आहे. कुणाल कामराविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रकिया सुरू होती. आमदार मुरजी पटेल यांचा जबाब घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करत आहे. शिवसैनिकांची मोठी गर्दी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन बाहेर जमली आहे.