
पत्रकार उमेश गायगवळे
सांताक्रुज पूर्व स्टेशन जवळ मीटर रिक्षा स्टॅन्ड साठी वेगळी राग आहे मात्र या रांगेत एकही रिक्षा उभा राहत नाहीत सर्व रिक्षा रांगेच्या बाहेर उभे राहतात रिक्षा चालक इच्छित स्थळी येण्यास नकार देत असल्याने महिलांना जेष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी पूर्वेकडून वाकोला, शिवाजीनगर, टीचर्स कॉलनी, वांद्रे, जवाहर नगर, निर्मळ नगर, गोळीबार आधी ठिकाणी रिक्षा चालक येण्यास नकार देत असल्याने ज्येष्ठ नागरिक बरोबर महिला विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या मुजोर रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी तसेच स्थानिक वाकोला पोलीस लक्ष घालून या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करतील का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कधीकाळी या ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा वाकोला पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिसतात मात्र आता तेही दिसेनासे झाले आहेत .त्यामुळे विशेषतः संध्याकाळच्या वेळेस रुग्ण शाळेचे विद्यार्थी महिला अर्धा अर्धा थांबून देखील रिक्षा मिळत नाहीत. त्यामुळे मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक वाकोला पोलीस ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या मुजोर रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक सुजाता नारकर, मनीषा वेंगुर्लेकर यांनी केली असून रिक्षा चालकांवर कारवाई झाली नाहीतर आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.