
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस परिषद पार पडली. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जे तीन नवे कायदे देशात तयार झाले आहेत. त्या कायद्यांचे महाराष्ट्रातील अंमलबजावणी याबद्दल एक सादरीकरण झाले.
ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे. त्यामुळे कोणताही पोलीस अधिकारी मग तो कोणत्याही पदावर असो हा जर ड्रग्स प्रकरणाशी थेट संबधित सापडला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांना निलंबित नव्हे तर सरळ बडतर्फ करण्यात येईल,” अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे. महाराष्ट्र पोलीस परिषदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये यावेळी घडलेल्या अनेक बाबी समोर मांडल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राने जो महासागर प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्या संदर्भात सादरीकरण झाले. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्हे झाल्यानंतर लवकरात लवकर आरोप पत्र दाखल करण्याकरता काय करावे, यासंदर्भात चर्चा झाली. महिलांच्या संदर्भात जे गुन्हे दाखल होतात. त्याबद्दल वेळेत आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल होणे, या संदर्भात आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. तसेच, ड्रग्सच्या संदर्भात कशाप्रकारे कारवाई सुरू आहे आणि कशाप्रकारे कारवाई व्हायला हवी, या संदर्भात देखील चर्चा झाली.” अशी माहिती त्यांनी दिली.
उद्योगांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, या दृष्टीने आपल्याला काय करता येईल? यासंदर्भात चर्चा झाली. नवीन कायद्यामध्ये लोकांच्या जप्त मालमत्ता या परत करता येतात. अशा तरतुदी आहेत, यावर काम करून पुढच्या 6 महिन्यांत पोलीस स्टेशन रिकामी झाले पाहिजेत,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय व्यवस्थित तपास केलेला आहे. तसेच, योग्य वेळेमध्ये संपूर्ण पुराव्यासहित आरोप पत्र दाखल केलेले आहे. आता आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की, हे प्रकरण त्यांनी फास्ट ट्रॅक वर चालवाव. सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.