
वार्ताहर – स्वप्नील गाडे
मुंबई – काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यांवर शनिवारी रात्री साडेनऊ च्या दरम्यान तीन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.आमदार झिशन सिद्दीकी यांच्या कार्यालया समोर बाबा सिद्दीकी यांच्यांवर तीन व्यक्तीनी गोळीबार केला.ही घटना मुंबई वांद्रे खेरवडी परिसरात घडली असून बाबा सिद्दीकी यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडल्याची माहिती आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.
बाबा सिद्दिकी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.