
वार्ताहर – स्वप्नील गाडे
मुंबई:वांद्रे येथील सर्वात मोठी शासकीय कर्मचारी वसाहत आहे.महाराष्ट्र शासनात कार्यरत असलेले विविध विभागातील कर्मचारी या शासनाच्या शासकीय कर्मचारी वसाहतीत गेले तीन पिढ्या वास्तव्य करीत आहेत.गेले १८वर्षे झाले शासकीय वसाहतीचा पुनर्विकासाचा प्रश्न मुद्दा सुरू झाल्या पासून ग.क्वॉ.रे.अ सोसायटी याच शासकीय वसाहती जवळपास जागा देण्याची मागणी करत होते.नऊ दिवसापासून कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले होते.
आता शासनाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करत. मुंबई येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी त्याच ठिकाणी भूखंड देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून.यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे,सदस्य संख्या निश्चित करणे तसेच अनेक कार्यपद्धती ठरवणे या विषयावर मंत्रिमंडळात निर्णय झाला.