
पत्रकार:उमेश गायगवळे
वांद्रे रिक्लेमेशन, माउंट मेरी रोड, तसेच खेरवाडी जंक्शन ते वाकोला सिग्नल पर्यंत मध्यरात्री मोटर्स सायकलची शर्यत लावणाऱ्या ५२ जनांवर कठोर कारवाई करत ५२ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
गेल्या काही महिन्यापासून माऊंट मेरी रोड, रिक्लेमेशन, पश्चिम दुर्गगती मार्गावरील खेरवाडी जंक्शन ते वाकोला या दरम्यान शेकडो मोटरसायकली मध्यरात्री येत असतात आजूबाजूच्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो अनेक तक्रारी करूनही मोटर सायकल चालकान वर कारवाई केली जात नसल्याची तक्रारी होत्या मात्र हे मोटरसायकल स्वार पोलीस येण्याच्या अगोदरच पसार होत होते.
काल वांद्रे पोलिसांनी आणि खेरवाडी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला मिळालेल्या तक्रारीवरून मध्यरात्री सापळा रचून वांद्रे पोलिसांनी 14 मोटरसायकली जप्त केल्या तर खेरवाडी पोलिसांनी 38 मोटरसायकली जप्त केल्या असून मोटरसायकल मालकांवर दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केलं या रेसलिंगमुळे इतर वाहनांना सार्वजनिक सुरक्षिततेचे धोका निर्माण होऊ शकतो या रेसलिंगमुळे दुसऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो ही गंभीर बाब लक्षात घेता पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच नागरिकांनी बेकायदेशीर रेसलिंग करणाऱ्या वाहन चालकांची तक्रार १०० नंबर ११२ किंवा ०२२ २२६४ १७५२ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार करण्याचे आव्हान केले आहे.