
पत्रकार:उमेश गायगवळे
मुंबईकरांना शुद्ध दूध पुरवठा करण्याच्या नावाखाली मुंबईतील तीन ते चार जकात नाक्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत 12 फेब्रुवारीने 13 फेब्रुवारी मध्यरात्री जकात नाक्यावर दुधाच्या गाड्यांवर अचानक धाडी टाकून भेसळयुक्त लाखो लिटर दूध जप्त केले. यावेळी स्वतः मंत्री नरहरी झिरवळ उपस्थित होते.
मुंबईत येणाऱ्या टँकर तसेच दुधाच्या पिशव्या वाहून येणाऱ्या गाड्या तपासून मध्यरात्री शिरवळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्यांनी मुलुंड चेक नाका हायवे आनंदनगर येथे १३ वाहने, मानखुर्द वाशी चेक नाका ४१वाहने , दहिसर चेक नाका १९ वाहने,ऐरोली चेक नाका येथे २५ वाहने, असे एकूण 98 वाहनांमध्ये ९६०८६३२ किमतीच्या एकूण १८३३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली यामध्ये गाईचे दूध, पाँश्चराइज्ड टोन्ट दुध, डबल टोन्ट दूध समावेश होता. मध्यरात्री टाकलेल्या धाडीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत अनेक उच्च अधिकारी या कारवाईत सामील झाले होते.