
मुंबई प्रतिनिधी
महिला नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या पदांसाठी होणार आहे. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांनी वेळ न दवडता आपले अर्ज भरावेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि बालविकास विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांसाठी तब्बल ४०,००० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. परंतु यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज प्रक्रियेत दिलेल्या माहितीच्या आधारे अंतिम यादी जाहीर केली जाईल.
भरती प्रक्रियेची माहिती:
पदाचे नाव: अंगणवाडी पर्यवेक्षिका
एकूण रिक्त पदे: ४०,०००
वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्ष
शैक्षणिक पात्रता: संबंधित राज्य सरकारच्या निकषांनुसार बदलू शकते
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन/ ऑफलाईन
पगार: ८,००० ते १८,००० दरमहा
निवड प्रक्रिया: गुणवत्ता यादीच्या आधारे
अर्जाची तारीख तारखा
महिला व बालविकास विभागाने या भरती प्रक्रियेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. या तारखा संबंधित संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकात नमूद केले आहेत. परंतु अजून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे जमा करून ठेवावीत.