
मुंबई प्रतिनिधी
विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता इंजिनियरिंगमध्ये नापास झाल्यावरही तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश दिला मिळणार आहे. अंभियांत्रिकीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. दहावीच्या वर्गात नापास झालेल्या उमेदवारांना ऐटीकेटीच्या माध्यमातून अकारावीला प्रवेश मिळतो. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
इंजिनियरिंगचे शिक्षण घेताना जर एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षात काही विषयात नापासा झाला तर त्याला तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत नाही. तीनपेक्षा जास्त विषयांमध्ये विद्यार्थी नापास नसावा, अशी अट आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाचे सर्व विषय क्लिअर असावे लागतात. अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षात नापास झालेल्या विषयात पास होणे गरजेचे आहे.परंतु आता या निर्णयात काही बदल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना कॅरीऑन या पर्यायाचा विचार न करता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण करावेत. यामुळे त्यांना चांगली नोकरी आणि रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे आवाहन केले जात आहे.
शासनाचा निर्णय काय?
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) यांच्यासाठी हा आदेश लागू होणार आहे.
पहिल्या वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रात आणि द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात प्रवेश मिळणार आहे.
पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची पात्रता २०२४-२५ म्हणजे हिवाळी परीक्षेच्या निकालावर ठरवावी.
पुढच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना विषम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. यासाठी महाविद्यालयाकडे हमीपत्र द्यावे लागेल.