
पुणे प्रतिनिधी
अनाथांचा नाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जाते. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, अडी अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीचा हात नेहमीच शिंदे प तत्परतेने धावून जातात.
याचा प्रत्यय नेहमीच पाहायला मिळतो. आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आर्थिक अडचणीत शिरीष मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं, ही बाब एकनाथ शिंदेंना समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून
आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवले. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदेंनी मदतीचा हात पुढे केला
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.
शिरीष महारांजांवर कुणाकुणाचं कर्ज?
शिरीष महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावर 32 लाख 35 हजारांचे कर्ज होते. मुंबईतल्या सिंघवजींचे 17 लाखाचे, बचत गटाचे 4 लाखांचे, सोने गहाण ठेवलेले त्याचे 1 लाख 30 हजार, वैयक्तिक कर्ज 2 लाख 25 हजार, चारचाकी वाहन 7 लाखाचे कर्ज आणि किरकोळ देणी 80 हजार असे एकूण 32 लाख 35 हजारांचे कर्ज होते.