सुधाकर नाडर, मुंबई
मुंबई : दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दादर मार्केट सुविधा येथे ‘वोट बचाव, देश बचाव’ आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड आणि धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रभारी डॉ. ज्योती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माहिम विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक क्रमांक १८२, १९०, १९१, १९२ आणि १९४ मध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
या आंदोलनाला महाराष्ट्राचे नेते राजन भोसले, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण नाईक, प्रशांत धुमाळ, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राऊत, दीपक वाघमारे, नेक्सन आचन, मुबारक शहा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


