
पत्रकार:उमेश गायगावळे
साप येण्याच्या अनेक तक्रारी आपण ऐकल्या असतील. काही साप हे बिनविषारी असतात तर काही भयंकर विषारी असतात,त्यामुळे अनेकांनी आपले प्राण देखील गमवले आहे.या आधी आपण साप घरात शिरला ऐकले असेल पण संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वांद्रेच्या बीकेसी पोलिस स्थानकात तब्बल ५ फुटाचा साप आढळला.यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली.
संध्याकाळी पोलिस कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना एका कर्मचाऱ्याने कपाटामागे हालचाल होत असल्याचे पाहिले. निरीक्षण केल्यावर मोठा साप असल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली.ही बातमी पसरताच पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
यानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्पमित्राला बोलावले.सर्पमित्र आल्यावर अनेक प्रयत्नांनंतर या विषारी सापाला पकडण्यात त्याला यश आले.यानंतर या सापाला पोलीस ठाण्याच्या बाहेर घेऊन जाण्यात आले.वांद्रे परिसरातील बीकेसी पोलिस स्थानकात ही घटना घडली.सर्प मित्र अतुल कांबळे यांनी हा साप पडला.हा साप 5 फुट लांबीचा असून हा साप भारतीय नाग जातीचा होता.सर्प मित्र अतुल कांबळे यांनी साप पकडण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस ठाण्यात विषारी साप आढळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता.
त्यानंतर हा साप नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आला. बीकेसी पोलिस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.
काही दिवसांपूर्वी सर्प मित्र अतुल कांबळे यांनी जिओ वर्ल्ड सेंटर मधून साप रेस्क्यू केला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील बीकेसी परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड सेंटर परिसरात एक विषारी साप आढळून आला होता . सुरुवातीला हा साप विषारी असल्याबाबत येथील कर्मचाऱ्यांना कल्पना नव्हती. सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी ‘वापरा’ या संस्थेला माहिती दिली. ‘वापरा’ या प्राणिमित्र संघटनेसोबत काम करणारे सर्पमित्र अतूल कांबळे जिओ वर्ल्ड सेंटर येथे दाखल झाले. त्यांनी सापाला सुरक्षीतपणे रेस्क्यू केले.