सातारा : प्रतिनिधी
‘अस्मिता खेलो इंडिया रग्बी सिटी लीग २०२६’ स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील १९२ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), इंडियन रग्बी फुटबॉल युनियन, रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२० सप्टेंबर २०२६) यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे ही स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेच्या उद्घाटनावेळी यशोदा टेक्निकल कॅम्पसचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष अखिल शेख, सातारा जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे खजिनदार व प्रशिक्षक अंकुश जांभळे तसेच सातारा तालुका क्रीडा संघटनेचे सदस्य मोहन पवार उपस्थित होते.
‘अस्मिता खेलो इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध खेळांतील संस्थांच्या सहकार्याने स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे आणि सातारा शहरात रग्बी खेळाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रग्बीच्या माध्यमातून मुलींना खेळाची संधी मिळण्याबरोबरच आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि स्वसंरक्षणासाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन मिळते, असे आयोजकांनी नमूद केले.
स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ईश्वर कोटारी आणि पंकज सिंग यांनी सांभाळली. त्यांच्या कामगिरीचे रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव नासिर हुसैन आणि खजिनदार मिनाल पासतेला यांनी कौतुक केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी अजिंक्य जांभळे आणि श्रीधर जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या कामगिरीचे सातारा जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन, सातारा चे अध्यक्ष वीरभद्र कावडे तसेच खजिनदार व प्रशिक्षक अंकुश जांभळे यांनी कौतुक केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
यू-१२ गट :
विजेता – एसई चॅलेंजर्स.
उपविजेता – एनईएस ब्राझील
द्वितीय उपविजेता – एनके शिवकन्या
यू-१५ गट :
विजेता – एसई क्वीन्स
उपविजेता – बीव्हीएस फिनिक्स
द्वितीय उपविजेता – एनके हिरकणी
पारितोषिक वितरण समारंभास हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड असोसिएशन, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अनिल निकाळजे, एल. बी. एस. कॉलेज, सातारा येथील शारीरिक शिक्षक मेजर मोहन वीरकर, डी. जी. कॉलेज, सातारा येथील शारीरिक शिक्षक अनिकेत बोबडे आणि न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथील शारीरिक शिक्षक सुधाकर गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

