मुंबई प्रतिनिधी
मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी आठवले यांच्या हातावर राखी बांधली. परिस्थितीच्या रेट्यामुळे या व्यवसायात येण्याची वेळ आलेल्या महिलांना सन्मानाचे जीवन मिळावे, यासाठी त्यांचे पुनर्वसन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले.
#WATCH Mumbai: Union Minister Ramdas Athawale celebrates Raksha Bandhan by visiting Mumbai's red-light area, Kamathipura, on the occasion of Raksha Bandhan.
He says, "I have come to Kamathipura for the first time today. The women living here are doing so out of compulsion; women… pic.twitter.com/wrdrSEVy6L
— ANI (@ANI) August 28, 2026
कामाठीपुऱ्यातील महिलांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, आपण पहिल्यांदाच कामाठीपुऱ्यात आलो आहोत. येथे विविध राज्यांमधून महिला उदरनिर्वाहासाठी येतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधूनही महिला येथे येत असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थितीमुळे त्यांना येथे राहून उदरनिर्वाह करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रक्षाबंधनाच्या दिवशी या महिलांच्या हस्ते राखी बांधून घेण्याचा बहुमान मिळाल्याचे सांगत आठवले यांनी त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. महिलांना अशा परिस्थितीत जीवन जगावे लागू नये, यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यांच्या पुनर्वसनासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामाठीपुऱ्यातील महिलांच्या प्रश्नांकडे केवळ सामाजिक समस्या म्हणून न पाहता त्यांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जीवन जगता यावे, यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे. पुनर्वसन, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक पुनर्वसनाच्या माध्यमातून या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला.

