मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल 246 गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयान आणि अनारक्षित डबे असलेल्या 184 मिश्र विशेष गाड्या, तसेच 62 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.
मुंबईतून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून 98, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून 76 आणि पुणे येथून 10 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी अनारक्षित विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि उपनगरांमध्ये राहणारे लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील आपल्या गावी जातात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
मुंबई ते सावंतवाडीसाठी विशेष रेल्वे
1) सीएसएमटी–सावंतवाडी रोड दैनिक विशेष : 32 सेवा
गाडी क्रमांक 01103
11 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज सीएसएमटीहून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01104
12 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज सावंतवाडी रोडहून पहाटे 4.35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 4.40 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
प्रमुख थांबे :
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
डब्यांची रचना :
2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
—
2) सीएसएमटी–सावंतवाडी रोड दैनिक विशेष : 34 सेवा
गाडी क्रमांक 01151
11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दररोज सीएसएमटीहून मध्यरात्रीनंतर 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01152
11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दररोज सावंतवाडी रोडहून दुपारी 3.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
प्रमुख थांबे :
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
डब्यांची रचना :
2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
—
रत्नागिरीसाठी सीएसएमटीहून विशेष गाडी
3) सीएसएमटी–रत्नागिरी दैनिक विशेष : 32 सेवा
गाडी क्रमांक 01153
11 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 दररोज सीएसएमटीहून सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.25 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01154
12 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दररोज रत्नागिरीहून पहाटे 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
थांबे :
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
डब्यांची रचना :
2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
—
एलटीटी–सावंतवाडी विशेष गाडी
4) लोकमान्य टिळक टर्मिनस–सावंतवाडी रोड दैनिक विशेष : 34 सेवा
गाडी क्रमांक 01171
11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दररोज एलटीटीहून सकाळी 8.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01172
11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दररोज सावंतवाडी रोडहून रात्री 10.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
प्रमुख थांबे :
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
डब्यांची रचना :
2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
—
पुणेकरांसाठीही विशेष रेल्वेची सुविधा
गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
5) पुणे–रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष : 4 सेवा
गाडी क्रमांक 01445
15 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी पुण्याहून मध्यरात्रीनंतर 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01446
15 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरीहून सायंकाळी 5.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.20 वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे :
चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
डब्यांची रचना :
3 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 15 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 1 द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार.
—
6) पुणे–रत्नागिरी साप्ताहिक विशेष : 6 सेवा
गाडी क्रमांक 01447
12, 19 आणि 26 सप्टेंबर 2026 रोजी पुण्याहून मध्यरात्रीनंतर 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01448
12, 19 आणि 26 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरीहून सायंकाळी 5.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.20 वाजता पुणे येथे पोहोचेल.
प्रमुख थांबे :
चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
डब्यांची रचना :
2 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार.
—
अनारक्षित प्रवाशांसाठी मेमू विशेष गाड्या
गणेशोत्सवात आरक्षित तिकिटांचा ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी दिवा, खेड आणि चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत.
7) दिवा–खेड–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष : 32 सेवा
गाडी क्रमांक 01155
11 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत, 22 सप्टेंबर वगळता, दिवा येथून सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि दुपारी 2.35 वाजता खेड येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01156
11 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत, 22 सप्टेंबर वगळता, खेड येथून दुपारी 4 वाजता सुटेल आणि रात्री 10.50 वाजता दिवा येथे पोहोचेल.
थांबे :
निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.
डब्यांची रचना : 12 डब्यांची मेमू रेक.
—
8) दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष : 30 सेवा
गाडी क्रमांक 01133
11 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज, 23 सप्टेंबर वगळता, दिवा येथून दुपारी 1.40 वाजता सुटेल आणि रात्री 9.30 वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01134
12 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज, 24 सप्टेंबर वगळता, चिपळूण येथून सकाळी 7.30 वाजता सुटेल आणि दुपारी 1 वाजता दिवा येथे पोहोचेल.
थांबे :
निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी.
डब्यांची रचना : 12 कार मेमू रेक.
—
आरक्षण कधी सुरू होणार?
गणपती विशेष आरक्षित गाड्यांचे आरक्षण सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
आरक्षणाच्या महत्त्वाच्या तारखा
आरक्षण सुरू होण्याची तारीख| गाडी क्रमांक
1 ऑगस्ट 2026| 01153, 01445, 01167 आणि 01447
2 ऑगस्ट 2026| 01165 आणि 01185
3 ऑगस्ट 2026| 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131
अनारक्षित डब्यांसाठी सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचाही वापर करता येईल.
विशेष गाड्यांच्या मार्गावरील सर्व स्थानकांवरील अचूक आगमन आणि प्रस्थान वेळा जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीचा किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने केलेली विशेष गाड्यांची घोषणा चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. मुंबई आणि पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षित तसेच अनारक्षित पर्याय उपलब्ध होणार असल्याने नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. मात्र, विशेष गाड्यांना मोठी मागणी असण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी आरक्षण सुरू होताच तिकीट काढण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.


