मुंबई प्रतिनिधी
मुंबई, पुणे आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. कर्जत–खंडाळा घाट विभागातील मंकी हिल परिसरात रविवारी (5 जुलै) झालेल्या मोठ्या दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेची मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरडीमुळे रेल्वे रुळांचे आणि ओव्हरहेड उपकरणांचे नुकसान झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने 16 गाड्या पूर्णपणे रद्द, अनेक एक्स्प्रेसचे मार्ग बदलले, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजिनेट केल्या असून काही गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून घाट विभागात युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, दरड हटविणे, रुळांची तपासणी आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र मुसळधार पाऊस कायम असल्याने सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (Cancelled Trains)
ट्रेन क्रमांक गाडीचे नाव
22105 / 22106 CSMT – पुणे – CSMT इंद्रायणी एक्स्प्रेस
12169 / 12170 पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
12127 / 12128 CSMT – पुणे – CSMT इंटरसिटी एक्स्प्रेस
11007 / 11008 CSMT – पुणे – CSMT डेक्कन एक्स्प्रेस
12123 / 12124 CSMT – पुणे – CSMT डेक्कन क्वीन
12125 / 12126 CSMT – पुणे – CSMT प्रगती एक्स्प्रेस
11009 / 11010 CSMT – पुणे – CSMT सिंहगड एक्स्प्रेस
11011 CSMT – धुळे एक्स्प्रेस
11012 (06 जुलै) धुळे – CSMT धुळे एक्स्प्रेस
11009 (06 जुलै) CSMT – पुणे सिंहगड एक्स्प्रेस
मार्ग बदललेल्या गाड्या (Diverted Trains)
11049 अहमदाबाद – कोल्हापूर एक्स्प्रेस
बदललेला मार्ग : कल्याण → इगतपुरी → मनमाड → दौंड कॉर्ड लाईन → पुणे
22944 इंदूर – दौंड एक्स्प्रेस
मार्ग : कल्याण → इगतपुरी → मनमाड → दौंड
12297 अहमदाबाद – पुणे दुरंतो
मार्ग : कल्याण → इगतपुरी → मनमाड → दौंड → पुणे
22144 बिदर – CSMT एक्स्प्रेस
मार्ग : दौंड → मनमाड → इगतपुरी → कल्याण
17614 नांदेड – पनवेल एक्स्प्रेस
मार्ग : दौंड → मनमाड → इगतपुरी → कल्याण
20915 लिंगमपल्ली – इंदूर हमसफर
मार्ग : दौंड → मनमाड → जळगाव → पाळधी → सुरत
22160 चेन्नई – CSMT एक्स्प्रेस
मार्ग : दौंड → अंकाई → मनमाड → इगतपुरी → कल्याण
11014 कोईमतूर – LTT एक्स्प्रेस
मार्ग : दौंड → अंकाई → मनमाड → इगतपुरी → कल्याण
12164 चेन्नई – LTT सुपरफास्ट
मार्ग : दौंड → अंकाई → मनमाड → इगतपुरी → कल्याण
अर्धवट अंतरावर थांबवलेल्या गाड्या (Short Terminated)
ट्रेन क्रमांक निर्णय
20822 संत्रागाछी–पुणे हमसफर पुणेऐवजी पनवेल येथे समाप्त
12116 सोलापूर–CSMT सिद्धेश्वर पुणे येथे समाप्त; पुढे 11301 लिंक ट्रेन
22731 हैदराबाद–CSMT हुसेन सागर पुणे येथे समाप्त
22226 सोलापूर–मुंबई वंदे भारत पुणे येथे समाप्त; पुढे 22225 म्हणून धावणार
बदललेल्या ठिकाणाहून सुटणाऱ्या गाड्या (Short Originate)
ट्रेन क्रमांक निर्णय
20821 पुणे–संत्रागाछी हमसफर पनवेल येथून सुटेल
11301 CSMT–बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस पुणे येथून सुटेल
12701 मुंबई–हैदराबाद हुसेन सागर पुणे येथून सुटेल
22225 मुंबई–सोलापूर वंदे भारत पुणे येथून सुटेल
वेळेत बदल (Rescheduled Trains)
ट्रेन क्रमांक गाडी जुनी वेळ नवीन वेळ
18520 LTT–विशाखापट्टणम एक्स्प्रेस सकाळी 6.55 सकाळी 9.55
11029 मुंबई–कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस सकाळी 8.40 सकाळी 11.40
20706 मुंबई–जालना/नांदेड वंदे भारत दुपारी 1.15 दुपारी 3.15
विशेष नोंद
20705 नांदेड–मुंबई वंदे भारत या गाडीचा रॅक 20706 साठी वापरण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे आवाहन
प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासावी.
रेल्वे चौकशी सेवा, अधिकृत संकेतस्थळ किंवा NTES वर अद्ययावत माहिती पाहावी.
घाट विभागातील परिस्थिती लक्षात घेता प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा.
अनावश्यक प्रवास टाळावा.
घाट विभागात दुरुस्ती युद्धपातळीवर
मंकी हिल परिसरातील दरड हटविण्यासाठी रेल्वेचे अभियंते, ट्रॅक मेंटेनन्स कर्मचारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी तैनात आहेत. रुळांची तपासणी, ओव्हरहेड वायर दुरुस्ती आणि सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच मुंबई–पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पुढील काही तास रेल्वे वाहतुकीवर परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


