
मुंबई प्रतिनिधी
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे.
सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय.
16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्य राहत्या घरी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी देखील याचा संबंध होता. मात्र, महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरु असताना यश आलेलं नव्हतं. जेव्हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झाल्या..त्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती.
गोविंद पानसरे यांच्या प्रकरणाचा सीआयडी कडून सुरु होता. मात्र, हा खटला अजूनही सुरु आहे. आरोपींना 2018 साली अटक करण्यात आली होती. आरोपी 6 ते 7 वर्षे झाले अटकेत आहेत. त्यामुळे त्यांनी जामीनास अर्ज केला होता. हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि तपास यंत्रणेला या खटल्यात यश देखील आलेलं नाही. त्यामुळे हायकोर्टाला जामी मंजूर केलाय.
सर्वोच्च न्यायालयात जायचं का? याबाबत आमच्या वकिलांशी चर्चा करु – मेघा पानसरे
मेघा पानसरे म्हणाल्या, माननयी न्यायालयाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधारे दिलेला आहे. आम्ही जजमेंट पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जायचं का? याबाबत आमच्या वकिलांशी चर्चा करु. प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. तपास यंत्रणांना याबाबत अपयश आलं आहे. हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. हा खटला प्रदीर्घ काळ चाललेला आहे. सहा वर्ष झाले..या काळात तपास यंत्रणा सुद्धा आम्ही बदलून घेतली आहे. नियमित सुनावणी घेऊन हा घटला संपवावा, असंही मेघा पानसरे म्हणाल्या.
न्यायमूर्ती ए एस किलोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाचा निर्णय
सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती
अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर – हायकोर्ट
याशिवाय तपासाताचा लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा
न्यायमूर्ती ए एस किलोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश.