
मुंबई प्रतिनिधी
बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ओला, उबेरप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असून पुढच्या दोन महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरु होणार आहेत.
त्यामुळे ट्रॅफिकमध्ये तासंतास अडकून पडण्यावर आता पर्याय निर्माण होणार असून मुंबईकरांचा प्रवासही अधिक जलद आणि स्वस्तात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बाईक टॅक्सी सुरु करताना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल.
मुंबई शहरात रॅपिडो सारख्या कंपन्यांनी या आधी टॅक्सी बाईक सुरू केल्या होत्या. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला होता. पण स्थानिक स्तरावर त्याला रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याचा अनुभव आला. तसेच त्याबाबत सरकारचे धोरणही स्पष्ट नव्हतं. त्यामुळे या कंपन्यांनी त्यांच्या सेवा बंद केल्या.