नाशिक प्रतिनिधी
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडनंतर एका नव्या लष्करी वैमानिकाने आपल्या प्रेयसीला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रसेवेची शपथ घेतल्यानंतर आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर घडलेला हा प्रसंग उपस्थितांसाठी विशेष ठरला.
#WATCH | Maharashtra: The passing out parade at the Combat Army Aviation Training School in Nashik, concluded on an emotional note for a couple as Captain Bharat Bhardwaj proposed marriage to his partner. pic.twitter.com/8Un1ZNBP1F
— ANI (@ANI) June 2, 2026
भारत भारद्वाज यांनी लष्करी लढाऊ वैमानिक म्हणून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. पासिंग आऊट परेडनंतर कुटुंबीय, सहकारी अधिकारी आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रेयसी आरुषीला एका लढाऊ हेलिकॉप्टरजवळ बोलावले. पुढे काय होणार आहे, याची कल्पना नसलेल्या आरुषीसमोर भारत यांनी अचानक गुडघ्यावर बसून अंगठी देत विवाहाची मागणी घातली.
Her body language says otherwise. She is just waiting for the day to get over.
— Gaurav Gupta (@Tech_StartupGuy) June 2, 2026
“तू माझ्याशी लग्न करशील का?” असा प्रश्न भारत यांनी विचारताच आरुषी काही क्षण आश्चर्यचकित झाली. त्यानंतर तिने होकार देत भारत यांना मिठी मारली. या प्रसंगानंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सहकारी अधिकारी आणि मित्रांनी चित्रित केला असून तो विविध सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी या क्षणाचे कौतुक करत नव्या प्रवासासाठी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करताना भारत म्हणाले, “सेवेत अधिकारी म्हणून आम्हाला सलामी मिळते आणि ती द्यावीही लागते. मात्र घरातील खरी जबाबदारी पत्नी सांभाळते. त्यामुळे ही माझ्याकडून तिच्यासाठी प्रेमाची खास सलामी होती.”
आरुषीनेही या प्रस्तावाबाबत आनंद व्यक्त करत, “अशा प्रकारच्या सरप्राईजची मला अजिबात अपेक्षा नव्हती. हा क्षण माझ्यासाठी कायम स्मरणात राहील,” असे सांगितले.
लष्करी शिस्त, करिअरमधील महत्त्वाचा टप्पा आणि वैयक्तिक आयुष्यातील नव्या सुरुवातीचा संगम घडवणारा हा प्रसंग सध्या सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.


