रणजित मस्के | प्रतिनिधी
ठाणे: स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या ठाणे व मुंबई विभागातील मुख्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ठाणे येथील रेल्वे ऑफिसमध्ये संपन्न झाली. या बैठकीत कल्याण येथील सामाजिक कार्यकर्त्या मेघना किरण पवार यांची संघटनेच्या ‘कल्याण तालुका संपर्क प्रमुख’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या या सभेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मेघना यांचा विशेष सन्मान करून त्यांना पुढील जबाबदारी सोपवण्यात आली.
मेघना पवार या संघटनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उज्वला किरण पवार यांच्या कन्या आहेत. ‘रक्तदान हेच महादान’ हा मंत्र जपत मेघना यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यांतही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत ही निवड करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मेघना पवार यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे कल्याण तालुक्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.


