पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलिस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने २५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले असून, त्यामध्ये सहा पोलिस निरीक्षकांकडे विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि विशेष शाखेतील निरीक्षकांचा समावेश आहे. तसेच, गुन्हे शाखेतील युनिटअंतर्गत बदल्यांसह तीन सहाय्यक पोलिस आयुक्तांच्याही फेरनियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर नेमणूक झालेले अधिकारी
जयंत राजूरकर (सहकारनगर ते समर्थ), विनय पाटणकर (नियंत्रण कक्ष ते सिंहगड रस्ता), मारुती पाटील (वाहतूक शाखा ते येवलेवाडी), संतोष खेतमाळस (आर्थिक गुन्हे शाखा ते लष्कर), राजेंद्र सहाणे (वाहतूक शाखा ते पर्वती) आणि गिरीश दिघावकर (लष्कर ते शिवाजीनगर) यांच्याकडे वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
राघवेंद्रसिंह क्षीरसागर (कल्याण शाखा ते उत्तमनगर), नंदकुमार गायकवाड (पर्वती ते वाघोली), मनीषा पाटील (मार्केट यार्ड ते लोहगाव), विश्वजीत जगताप (लोहगाव ते मार्केट यार्ड), महेश बोळकोटगी (शिवाजीनगर ते वारजे माळवाडी), उमेश गित्ते (समर्थ ते लक्ष्मीनगर), मोहन खंदारे (उत्तमनगर ते आर्थिक गुन्हे शाखा), दिलीप दाईंगडे (सिंहगड रस्ता ते गुन्हे शाखा), अमर काळंगे (येवलेवाडी ते शिवाजीनगर–गुन्हे), युवराज हांडे (वाघोली ते गुन्हे शाखा), विश्वजीत काईंगडे (वारजे माळवाडी ते खंडणीविरोधी पथक), माया देवरे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), मनोजकुमार लोंढे (गुन्हे शाखा ते सहकारनगर–गुन्हे), नीलेश बडाख (वारजे माळवाडी ते मुंढवा), पल्लवी मेहेर (येरवडा ते वाघोली), नितीन भोयर (सिंहगड रस्ता ते विशेष शाखा), जितेंद्र कदम (गुन्हे शाखा ते कल्याण शाखा), सुनीता नवले (मार्केट यार्ड ते येवलेवाडी) आणि धनंजय पिंगळे (शिवाजीनगर ते वाहतूक शाखा) यांचा समावेश आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या फेरनियुक्त्या
चंद्रकांत भोसले (वाहतूक शाखा ते विश्रामबाग विभाग), सुजाता तानवडे (वाहतूक शाखा ते कोथरूड विभाग) आणि डॉ. शीतल जानवे (कोथरूड विभाग ते पुणे शहर आस्थापना) अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.
या प्रशासकीय बदल्यांमुळे पोलिस ठाण्यांचे कामकाज अधिक गतिमान होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


