
वार्ताहर -स्वप्नील गाडे
मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचे भूमी पूजन २३/९/२०२४रोजी शासकीय वसाहती मधील पटांगणात केल्यानंतर.६०वर्ष गेल्या ३पिढ्या शासकीयकर्मचारी वसाहत मध्ये राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी २ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकीहक्काची घरे दया.
या मागणी साठी उपोषण करण्यात येणार असल्याचे गव्हरमेन्ट कॉवटर्स रेसिडेंटस असोसिएशनने स्पष्ट केले आहे.मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट महिन्या मध्ये (ग.क्वा.रे.अ)शिष्टमंडळा सोबत बैठक घेतली होती.
आणि प्रशासनाला विशेषबाब म्हणून जवळपासच्या परिसरात कर्मचाऱ्यांना भूखंड उपलब्ध करून देता येईलका.या विषयाची चाचपनी करण्याचे आदेश दिले होते.
रहिवाशांनी त्याच परिसरात २५००सदनिका आवश्यक असून त्यासाठी एकूण १२एकर जागेची मागणी शासनाकडे केली आहे.या प्रकल्पासाठी ३५०कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती.परंतु प्रस्तावाला राज्य सरकारने पाट दाखवल्या मुले सरकारी कर्मचाऱ्यांनी २ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे