
मुंबई:प्रतिनिधी
जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल, जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील, तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता! सरकारने या समस्यांसाठी टोल-फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
रेशनवर मिळणाऱ्या वस्तू:
गहू तांदूळ तेल साखर डाळी
जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या, जास्त पैसे घेतले किंवा धान्य वेगळ्या विक्रेत्याला विकले, तर तुम्हाला आता त्वरित *तक्रार करण्याचा अधिकार* आहे!
*रेशनसंबंधी प्रमुख समस्या:
*धान्य कमी प्रमाणात देणे
*अनावश्यक शुल्काची मागणी
*नवीन रेशन कार्डसाठी अडथळे
*दुकानात वेळेवर सेवा न देणे
*तक्रार नोंदणीसाठी उपाय:
टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा
महाराष्ट्रासाठी:* 1967 / 1800-224-950
तुमची तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्वरीत कार्यवाही केली जाईल.
ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार करा
https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx
वेबसाइटवर तुमचे नाव, रेशन कार्ड क्रमांक, समस्या यांचा तपशील द्या.
तक्रारीचा पाठपुरावा ऑनलाईन करू शकता.