दक्षिण कोरिया:
दक्षिण कोरियातील गुमी येथे २७ ते ३१ मे दरम्यान पार पडलेल्या २६व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरीची छाप सोडत विश्वस्तरीय दम दाखवला. एकूण २४ पदकांची कमाई करीत भारताने पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले. यात ८ सुवर्ण, १० रौप्य व ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीनने अव्वल स्थान मिळवले.
Empty stadium, no cheer .. just by herself 🫡 Carrying our 🇮🇳’s pride in silence 🔥
That’s @JyothiYarraji athelete winning a gold in 100m hurdles on 29th May 2025 at the 26th Asian Athletics Championships
Look up her journey & feel the pride in her teary eyes 🥹
We’re proud of… pic.twitter.com/UocdRX9heO— ExtraSpiceAni (@ShrivastavAni) December 22, 2025
या स्पर्धेत भारतीय हर्डलर ज्योती याराजीच्या सुवर्णपदक विजयानंतरचा भावूक क्षण हे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले. पावसाळी वातावरणामुळे स्टेडियम जवळपास रिकामे असताना, राष्ट्रगीताच्या सूरांसोबत डोळ्यांत दाटलेले भावूक अश्रू हा दृश्य सोशल मीडियावर व्हायरल ठरला असून क्रीडाप्रेमींनी त्यावर मोठी दाद दिली आहे.
विक्रम मोडणारी सुवर्ण झेप
महिलांच्या १०० मीटर हर्डल्समध्ये ज्योती याराजीने १२.९६ सेकंदांचा वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले आणि नवीन चॅम्पियनशिप विक्रम प्रस्थापित केला. ही तिच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
सलग दुसऱ्यांदा किताब जिंकत ती आशियाई स्तरावर दुहेरी सुवर्णपदक विजेती ठरली. सुरुवातीला मागे असतानाही अखेरच्या टप्प्यात जपान व चीनच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिने दमदार पुनरागमन केले.
रिकामे स्टेडियम, तिरंग्यासमोर भावूक क्षण
पावसामुळे प्रेक्षकविरहित वातावरण… स्टेडियममध्ये पसरणारा शुकशुकाट… आणि त्या शांततेत घुमणारे राष्ट्रगीत.
तिरंगा फडकत असताना ज्योतीच्या डोळ्यांत अनावर झालेले अश्रू हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ठरला असून अनेकांनी तिच्या संघर्षयात्रेला सलाम केला आहे.
भारताची दैदिप्यमान कामगिरी
भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत अनेक उल्लेखनीय कामगिरी नोंदवल्या
गुलवीर सिंग – ५००० मीटर व १०००० मीटरमध्ये दुहेरी सुवर्ण
अविनाश साबळे – ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये सुवर्ण
पूजा सिंग – उंच उडी, सुवर्ण
नंदिनी अगासारा – हेप्टॅथ्लॉन, सुवर्ण
महिला ४x४०० मीटर रिले संघ – सुवर्ण
६० हून अधिक भारतीय खेळाडूंनी सहभाग Qनोंदवत
देशासाठी बहुमोल योगदान दिले.
संघर्षातून शिखरावर ज्योतीचा प्रवास
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे साध्या कुटुंबात जन्मलेल्या ज्योतीचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो.
वडील खासगी सुरक्षा कर्मचारी
आई रुग्णालय स्वच्छता कर्मचारी व घरकाम
मर्यादित उत्पन्नात शिक्षण व क्रीडा प्रवास
शालेय शिक्षकांनी तिच्यातील क्षमता ओळखून तिला हर्डल्सकडे वळवले.
आज ती राष्ट्रीय विक्रमधारक व आशियाई पातळीवरील अग्रगण्य हर्डलर ठरली आहे.
सध्या ती रिलायन्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये कोच जेम्स हिलियर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
कामगिरीचा उज्ज्वल धांडोळा
• राष्ट्रीय विक्रम : १००मी हर्डल्स १२.७८ सेकंद
• राष्ट्रीय विक्रम : ६०मी हर्डल्स (इनडोअर) ८.१३ सेकंद
• आशियाई ॲथलेटिक्स २०२३ सुवर्ण
• आशियाई इनडोअर २०२३ रौप्य
• वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ कांस्य
• आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ रौप्य
• अर्जुन पुरस्कार २०२४
• आशियाई ॲथलेटिक्स २०२५ सुवर्ण
आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील ही उल्लेखनीय कामगिरी
भारतीय ॲथलेटिक्सच्या नव्या भविष्याचा विश्वासार्ह संकेत मानली जात आहे.
पावसाळी स्टेडियममध्ये सुनसान वातावरणात उभा ठाकलेला तिरंगा आणि अश्रूंच्या धारा
ज्योती याराजीचा हा क्षण राष्ट्राच्या सामूहिक अभिमानात नोंदला गेला.


