पुणे प्रतिनिधी
राज्यातील हवामानाचा वेगवान बदल पुन्हा एकदा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत थंडीचा जोर इतका वाढला की अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला. अहिल्यानगर जिल्ह्याने मात्र राज्यातील थंडीचा कुटेर्क मोडत तब्बल ७.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद केली.
Cold wave very likely to prevail in isolated pockets over Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/1fimlGvJbF— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 10, 2025
अहिल्यानगरनंतर जळगाव, मालेगाव, नाशिक, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांनीही कडाक्याच्या थंडीत गारठून गेले. मागील आठवडाभर तापमानात तुलनेने उब जाणवत असतानाच अचानक आलेल्या या गारठ्याने राज्यभरात पुन्हा एकदा हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र झाली आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये १४ ते १५ अंशांवर स्थिरावलेले किमान तापमान ४८ तासांत ७ ते ९ अंशांपर्यंत खाली घसरले. विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भागांत थंडीची लाट (Cold Wave) जाणवत असून पहाटे धुक्याचे प्रमाणही वाढले आहे.
हवामान विभागानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहणार आहे. किमान तापमानात अजून १ ते २ अंशांनी घसरण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांत थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
• अहिल्यानगर : ७.५
• जळगाव : ८
• नागपूर : ८
• नाशिक : ८.१
• पुणे : ८.४
• गोंदिया : ८.४
• यवतमाळ : ८.८
• बीड : ९
• मालेगाव : ९.४
• वर्धा : ९.५
• परभणी : १०.५
• छत्रपती संभाजीनगर : १०.८
• अकोला : १०.८
राज्यात हिवाळ्याचा गारवा पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ योग्य काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.


