पुणे प्रतिनिधी
हिवाळ्याच्या झुळुकेसोबतच फळबाजारात फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. आवक अत्यल्प असल्याने पहिल्याच दिवशी प्रतिडझन तब्बल ३ हजारांपर्यंत दर झेपावत आहे. आंब्याच्या चाहत्यांसाठी मात्र हे ‘सीझन ओपनिंग’चं संकेतक ठरत आहे. दरम्यान, देशी बोरांची आवक सुरू झाली असून स्ट्रॉबेरीला वाढत्या थंडीचा हातभार लागल्यानं मागणी तेजीत आहे.
फूलबाजार : लग्नसराईने गुलाब महागला
फूलबाजारात उंचावलेले दर अजूनही ‘जैसे थे’ आहेत. आवक आणि मागणी यांचा ताळमेळ जमत नसला तरी दरांमध्ये मोठी चढउतार दिसत नाही. मात्र लग्नसराईमुळे गुलाबाचे भाव कधी आवाक्यात, तर कधी आवाक्याबाहेर जात आहेत. झेंडू, शेवंती, निशिगंध यांच्यातही स्थिरता अधिक दिसत आहे.
भाजीपाला बाजार : दत्तजयंतीचा परिणाम, वांग्याचा भडका
दत्तजयंतीआधीच्या खरेदीमुळे काही भाज्यांमध्ये खास करून वांग्याचे दर कडाडले आहेत. या आठवड्यात सर्वसाधारण आवक घटलेली असल्याने बाजारात ‘टाईट’ वातावरण जाणवत आहे. टोमॅटोचे दर मात्र खाली येत असल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळत आहे. हंगामी सोलानां बाजारात दाखल होत असून प्रतिपेंढी २०–२५ रुपये भाव कायम आहे. कांदापात आणि मेथीच्या अपुऱ्या आवकेमुळे दर वाढलेले आहेत.
भाजीपाला दर (प्रतिकिलो रुपये)
• टोमॅटो : ३०–४०
• दोडका : ६०–८०
• वांगी : १००–१२०
• कारली : ५०–६०
• ढोबळी मिरची : ६०–८०
• मिरची : ४०–५०
• फ्लॉवर : ५०–६०
• कोबी : २०–२५
• बटाटा : ३०–३५
• कांदा : १५–२०
लसूण/आले : ६०–८०
• लिंबू : ३००–४०० शेकडा
• गाजर : ५०–६०
• हिरवा वाटाणा : १४०–१५०
• बिन्स : ८०–१००
• देशी गवार : १२०–१६०
• वरणा : ६०–८०
• भेंडी : ८०–१००
• देशी काकडी : ६०–८०
• काटा काकडी : ३०–४०
• दुधी : ५०–६०
• कोथिंबीर : ८–१०
• मेथी/कांदापात : २०–२५
• भाज्या (पेंढी) : १५–२०
• शेवगा (नग) : ५०–६०
फळबाजार (प्रतिकिलो / डझन)
• देशी सफरचंद : १५०–१६०
• परदेशी सफरचंद : ३००–३५०
• संत्री : १२०–१५०
• मोसंबी : ८०–१००
• डाळिंब : १५०–४००
• चिकू : १२०–१५०
• पेरू : ८०–१००
• पपई : ३०–६०
• मोर आवळा : १२०–१५०
• सीताफळ : १००–१५०
• कलिंगड : १००–१२०
• टरबूज : ४०–६०
• केळी : ४०–५० डझन
• देशी केळी : ७०–८० डझन
• किवी : १३०–१५०
• ड्रॅगनफळ : १८०–२००
• चिंच : १००–१४०
• राणी अननस : १२०–१५०
खाद्यतेल
• सरकी : १४५–१५०
• शेंगतेल : १८०–१९०
• सोयाबीन : १४०–१४५
• पामतेल : १४०–१४५
• सूर्यफूल : १६०–१६५
कडधान्य
• हायब्रीड ज्वारी : ३५–५५
• बार्शी शाळू : ५०–६०
• गहू : ३३–४४
• हरभराडाळ : ७२–७५
• तुरडाळ : ११०–१२०
• मुगडाळ : १००–११०
• मसूरडाळ : ८०–९०
• उडीदडाळ : ११०–१२०
• हरभरा : ७०–७५
• मूग : ११०–१३०
• मटकी : १३०–१५०
• मसुर : ७५–८०
• फुटाणाडाळ : ८५–९०
• चवळी : ९०–१२०
• हिरवा वाटाणा : १४०
• छोला : १००–१३०
नारळाचे दर अखेर रुळावर
किरकोळ बाजारात अनेक महिन्यांनंतर नारळाने ‘स्वस्ताई’चे दर्शन घडवले. आवक वाढल्याने ५ ते १० रुपयांनी दर घसरले असून ग्राहकांचे बजेट काहीसे सैल झाले आहे.


