मुंबई प्रतिनिधी
बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले असून, या पत्रावर संजय नावाच्या व्यक्तिचे नाव प्रेषक म्हणून लिहिलेले आढळून आले आहे.
या धक्कादायक घटनेनंतर आमदार उपाध्ये यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.बोरिवली पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतल्यामुळेच त्यांना सतत धमक्या मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धमकीचे पत्र मिळताच त्यांच्या कार्यालयाबाहेर व आसपासच्या परिसरात पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संबंधित पत्र कोणी तयार केले, त्याचा उद्देश काय आणि आठही संशयितांची भूमिका काय याचा तपास पोलीस वेगाने करत आहेत.


