स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | अंधेरी परिसरात झालेल्या खुनाचा गुन्हा अवघ्या आठ तासांत उघडकीस आणत अंधेरी पोलीसांनी दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून जेरबंद केले. मरोळ-सहार पाईपलाईन येथील इम्पोर्ट वेअरहाऊससमोरील मोकळ्या जागेत २६ नोव्हेंबर रोजी सापडलेल्या अज्ञात जखमी तरुणाच्या हत्येचा हा प्रकार आहे.
जखमी अवस्थेत आढळलेल्या या तरुणाला तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले. तपासात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्तीची ओळख मोहित जगतराम सोनी (२८), रा. मरोळ पाईपलाईन, अंधेरी पूर्व व मूळ गोंडा जिल्हा, उत्तर प्रदेश अशी पटली.
या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८०२/२०२५ कलम १०३(१) भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे दोन आरोपींची नावे निश्चित झाली.
आरोपी खुनानंतर रेल्वेने उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळताच अंधेरी पोलीसांनी परिमंडळ १० मधील अनेक पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांची १० शोधपथके तयार करून पाठवली. त्यानंतर एका पथकाने उत्तर प्रदेशातून दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे.
अटक आरोपीची नावे : १) रोहित गंगाराम पाल (२४), रा. बहराईच, उत्तर प्रदेश २) मनोज कुमार विश्वनाथ सोनी (२५), रा. पयागपूर, बहराईच, उत्तर प्रदेश
या यशस्वी तपासासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चातुर्याचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे व सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, पोनि सतिश कावणकर, सपोनि संजय कांदळकर, पोउनि किशोर परकाळे, पोउनि समाधान सुपे, पोउनि सुहास पाटील, पोउनि रोहन सुर्वे, गुन्हे प्रकटीकरण पथक, तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांचा महत्वाचा सहभाग होता.
मेघवाडी : पोउनि मनोज भोसले
जोगेश्वरी : सपोनि नागेश मिसाळ
एमआयडीसी : पोउनि चव्हाण
साकिनाका : पोउनि सुनील चव्हाण
सहार : पोउनि सुशांत बावचकर
तांत्रिक मदत : पोहक्र विशाल पिसाळ
पोलीसांच्या जलद गतीने केलेल्या कारवाईमुळे गंभीर गुन्हा तात्काळ उघडकीस आला असून परिसरात दिलासा निर्माण झाला आहे.


