
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोज सरन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्यांची एमएसआरडिसीचे कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी आले असता त्यांनी या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विशेष बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे तसेच कोयना नदीच्या लगत असलेल्या दोनशे चौदा गावात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला.
तसेच यावेळी ग्रामस्थांनी कोयना नदीचे पत्रातील पाणी हे स्थिर असल्याने येथे चालवण्यात येणाऱ्या बोटींना समुद्रातील बोटींप्रमाणे नव्हे तर वेगळे नियम लावावेत अशी मागणी केली. या बोटींना लावण्यात येणारे काही नियम दुरुस्त करून नवीन नियम तयार करावे असे सुचवले. त्याबाबत हे नियम तपासून त्यात आवश्यक ते बदल करावे असे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.