मुंबई प्रतिनिधी
महापालिकेच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती-अभियानामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना पाणीटंचाईचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अमर महल भूमिगत बोगद्याच्या शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिमी व्यासाच्या महत्त्वपूर्ण जलवाहिनीचे छेदजोडणीचे काम हाती घेण्यात आल्याने १ डिसेंबर सकाळी १० ते २ डिसेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील एकूण ११ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा पूर्णतः थांबणार आहे.
घाटकोपर (पूर्व) येथील छेडानगर जंक्शन परिसरात ३००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील हे काम तब्बल ३० तास सुरू राहणार असून शहर व पूर्व उपनगरातील मोठा भूभाग यातून प्रभावित होणार आहे. दरम्यान, ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर तसेच एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस आणि एन विभागात पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात डळमळीत राहणार आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणीपुरवठा बंद राहील त्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे आणि पुरेसा साठा करून ठेवावा.
कोणत्या विभागांमध्ये पाणीपुरवठा ठप्प होणार?
ए विभाग
बीएचआर जलाशय परिसर, सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डी’मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, आरबीआय, नौदल डॉकयार्ड, जीपीओ–रिगल सिनेमा पट्टा
१ डिसेंबर : कमी दाब
२ डिसेंबर : पूर्ण बंद
बी विभाग
वाडीबंदर, डोंगरी ‘ए’, रेल्वे व बीपीटी क्षेत्र
१ डिसेंबर : कमी दाब
२ डिसेंबर : पूर्ण बंद
सी विभाग
बाबुला टँक परिक्षेत्र, मुंबई सेंट्रल परिसर
२ डिसेंबर : पूर्ण पाणीपुरवठा बंद
ई विभाग
नेसबिट रोड, नागपाडा, मुंबई सेंट्रल, काळाचौकी, डारुखाना, रे रोड, हाजीबंदर परिसर
१ डिसेंबर : कमी दाब
२ डिसेंबर : पूर्ण बंद
जे. जे. रुग्णालयाला दोन्ही दिवशी कमी दाबाचा पुरवठा.
एफ दक्षिण विभाग
शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर, परळ, नायगाव
१ डिसेंबर : कमी दाब
२ डिसेंबर : पूर्ण बंद
एफ उत्तर विभाग
शीव, दादर, कोरबा मिठागर, प्रतीक्षा नगर, कफ परेड परिसर—
२ डिसेंबर : पूर्ण बंद
काही भागात १ डिसेंबरलाही कमी दाब
एल विभाग
नवीन टिळक नगर, कुर्ला पूर्व, नेहरू नगर—
२ डिसेंबर : बंद
१ डिसेंबर : काही भागात बंद
एम पूर्व विभाग
शिवाजी नगर, मानखुर्द, देवनार, वाशी नाका, बीएआरसी वसाहत
१ डिसेंबर : पूर्ण बंद
२ डिसेंबर : कमी दाब
एम पश्चिम विभाग
चेंबूर, माहुल, जिजामाता नगर, अंबापाडा
१ डिसेंबर : पूर्ण बंद
२ डिसेंबर : कमी दाब
एन विभाग
घाटकोपर (पूर्व/पश्चिम), विद्याविहार, पंतनगर, विक्रोळी—
१ डिसेंबर : पूर्ण बंद
२ डिसेंबर : कमी दाब
एस विभाग
भांडुप (पूर्व), नाहूर, कांजूर, विक्रोळी (पूर्व)—
१ डिसेंबर : पूर्ण बंद
२ डिसेंबर : कमी दाब
महापालिकेने स्पष्ट केले आहे की हे काम अत्यंत आवश्यक असून शहराच्या दीर्घकालीन जलपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, या दोन दिवसांत लाखो नागरिकांना पाण्याअभावी अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
नागरिकांनी अनावश्यक पाणी वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे


