मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून महाराष्ट्रातही वाद निर्माण झाला असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. SIR प्रक्रियेमुळे मतदारांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा याचिकांमधून उपस्थित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण केले जात असताना या प्रक्रियेच्या पद्धतीवर आणि त्याच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रातही या प्रक्रियेविरोधातील पडसाद उमटू लागले असून, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या याचिकांमुळे SIR प्रक्रियेबाबतचा न्यायालयीन वाद आता मुंबई उच्च न्यायालयासमोर पोहोचला आहे.
SIR प्रक्रियेत मतदारांची माहिती तपासणे आणि मतदार याद्यांमध्ये आवश्यक ते बदल करणे यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कार्यवाही केली जात आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांमुळे निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदारांच्या हक्कांचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.


