
मुंबई प्रतिनिधी
मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण झाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 1000 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली, तर निफ्टी 500 अंकांपेक्षा जास्त खाली गेला.
अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली. यामुळे उत्पन्नात घट होण्याच्या चिंतेने भारतीय बाजारात मोठी घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,048.90 अंक म्हणजे 1.36% घसरून 76,330.01 अंकांवर बंद झाला तर निफ्टी निर्देशांक 345.55 अंक म्हणजे 1.47% घसरून 23,085.95 अंकांवर बंद झाला. मिड कॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स चारहून अधिक टक्क्यांनी घसरले.
मुंबई शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 14.54 लाख कोटी रुपयांनी घटून 417.67 लाख कोटी रुपयांवर आले आहे. शेअर बाजारात अशीच घसरण गेल्या सोमवारी म्हणजे 6 जानेवारी रोजी झाली होती. तेव्हा गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
शेअर बाजार का कोसळला ?
डिसेंबरमध्ये अमेरिकेत रोजगार वाढल्याचे आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली. त्यामुळे 10 वर्षांच्या ट्रेझरी यील्ड 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. यामुळे 2025 मध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली. याचा परिणाम भारतासारख्या देशातील गुंतवणूक कमी आकर्षक ठरली.
2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय बाजारात 10 जानेवारीपर्यंत 22,259 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली आहे.
सोमवारी तेलाच्या किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स 1.35 डॉलर म्हणजे 1.69% वाढून 81.11 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.
आठवड्याच्या सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 23 पैशांनी घसरून 86.27 डॉलरच्या निचांकी पातळीवर पोहोचला.
आर्थिक वर्ष 2025 साठी भारताच्या GDP वृद्धीचा अंदाज 6.4% आहे. जो अर्थ मंत्रालयाच्या 6.5% आणि RBI च्या 6.6% च्या अंदाजापेक्षा कमी आहे.
डिसेंबरमधील महागाई दर 5.3% पर्यंत घसरल्याचा अंदाज आहे. जो RBI च्या व्याजदर कपातीच्या शक्यतेला चालना देऊ शकतो.
गेल्या २ तिमाहीत भारतीय कंपन्यांच्या कमाईत घट झाली आहे. याआधी सलग ४ वर्षे कंपन्यांच्या कमाई दुहेरी अंकी वाढी झाली होती.
रॉयटर्सच्या एका सर्वेक्षणानुसार अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे डिसेंबरमध्ये भारतातील महागाई दर ५.३% पर्यंत कमी झाली असण्याचा अंदाज आहे. यामुळे पुढील महिन्यात आरबीआयकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढू शकते.