मुंबई प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेच्या दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने ‘संविधान गौरव सोहळा’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी सहा वाजता शासकीय वसाहत , वांद्रे (पूर्व) येथील पक्ष कार्यालय जवळ हा कार्यक्रम होणार असून, संविधान दिनाचे महत्त्व जनमानसात दृढ करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री मा. ना. रामदास आठवले असणार असून, कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
‘आपल्या सर्वोच्च संविधानाचे सदैव स्मरण ठेवून, जगासमोर लोकशाहीचा नवा आदर्श निर्माण करू’ असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
कार्यक्रमात ‘साजन विशाल लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले असून, भीमरूपी गाण्यांचा भव्य सादरीकरणाचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन अमित जनार्दन तांबे, अध्यक्ष – उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, यांनी केले असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीला गती दिली आहे. संविधान दिनानिमित्त सामाजिक एकात्मता, समानता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक यांचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


