स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | काळाचौकी पोलिसांनी तब्बल २५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. १९९२ मध्ये दाखल झालेल्या गु.र.क्र. १६/१९९२, कलम ३२५, ५०४, ११४ भादंवि अंतर्गत नोंद झालेल्या या प्रकरणात विलास गणपत घोरपडे हा आरोपी गुन्हा नोंद झाल्यापासून बेपत्ता होता. त्याच्याविरुद्ध माझगाव येथील १५ व्या न्यायालयाने स्थायी अटक वॉरंट जारी केले होते.
परिमंडळ ४ मध्ये सुरू असलेल्या फरार आरोपी शोध मोहिमेदरम्यान घोरपडे सातारा जिल्ह्यात भाड्याने राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १८ नोव्हेंबर रोजी रात्री काळाचौकी पोलिस पथकाने साताऱ्यात छापा घालून आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती,पोलीस सह आयुक्त सत्य नारायण चौधरी,अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्रीमती रागसुधा आर, सहायक पोलीस आयुक्त घनःशाम पलंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (काळाचौकी) विजयकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर, सपोनि चेतन मराठे, पोउपनि संदेश कदम आणि पोलीस शिपाई ओंकार कंक यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पार पडली.


