
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने सुवर्णसंधी दिली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) अंतर्गत २०२५ सालासाठी पदवीधर स्तरावरील भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत ५८१० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या तारखा
• ऑनलाइन अर्जाची सुरुवात: २१ ऑक्टोबर २०२५
• अर्जाची अंतिम तारीख: २० नोव्हेंबर २०२५
• फी भरण्याची अंतिम तारीख: २२ नोव्हेंबर २०२५
• अर्ज दुरुस्ती विंडो: २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५
अर्ज शुल्क
सामान्य / ओबीसी उमेदवारांसाठी: ₹५०० (CBT-1 मध्ये हजर झाल्यावर ₹४०० परत)
SC / ST / EWS / महिला / PwBD उमेदवारांसाठी: ₹२५० (CBT-1 मध्ये हजर झाल्यावर संपूर्ण रक्कम परत)
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
वयोमर्यादा: १ जानेवारी २०२६ रोजी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे असावे.
वयातील सवलत:
SC/ST: ५ वर्षे
OBC (Non-Creamy Layer): ३ वर्षे
• अर्ज कसा करायचा?
1. RRB च्या अधिकृत वेबसाइटला rrbapply.gov.in भेट द्या.
2. वन-टाईम रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
3. लॉगिन करून “Graduate Level Posts under CEN 06/2025” निवडा.
4. आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
5. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
तरुणांसाठी सुवर्णसंधी
रेल्वेमधील ही भरती मोहीम दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झाली असून, देशभरातील लाखो उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. स्थिर सरकारी नोकरी, आकर्षक पगारमान आणि सर्व सुविधांसह रेल्वे सेवेत करिअर करण्याची संधी आता तुमच्या दारी आली आहे.
हजारो तरुणांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थाने “सुखाची बातमी” घेऊन आली आहे.
RRB NTPC 2025 भरतीसाठी आजच अर्ज करा आणि आपल्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या दिशेने पहिले पाऊल टाका!